Wednesday, September 11, 2024
Homeनगरमहागाई आवरा सरकार!

महागाई आवरा सरकार!

अहमदनगर | प्रतिनिधी

करोना (Corona) काळात आर्थिक संकटात (Economic crisis) सापडलेल्या सामान्य नागरिकांवर महागाईचे (Inflation) संकट दररोज वाढत असल्याने सध्या खदखद वाढली आहे. गेल्या 7 वर्षात गॅस सिलेंडरचा (Gas cylinder) दर दुप्पट झाल्यानंतर ‘महागाई आवरा सरकार’, असा सूर नागरिकांमधून उमटत असून अपवाद वगळता विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील (Opposition and ruling party) नेत्यांनी महागाईच्या विषयावर तोंडाला कुलूप लावून घेतल्याने नागरिकांच्या रागात भर पडली आहे.

- Advertisement -

आयटी पार्कच्या नावे आमदारांकडून गंडा

काल सरकारी कंपन्यांनी पेट्रोलचे दर (Petrol Rate) 17 पैशांनी कमी करताना घरगुती गॅस सिलेंडरचे (LPG gas cylinder price hike) दर 25 रूपयांनी वाढवले. 15 दिवसांत गॅस सिलेंडरचे दर (Gas cylinder rate) 50 रूपयांनी वाढले आहेत. तर गेल्या 9 महिन्यात ही वाढ तब्बल 190 रूपयांची आहे. कालच्या दरवाढीनंतर नगर शहरात गॅस सिलेंडरचे दर थेट 898 रूपयांवर पोहचले आहे. त्यात डिलेव्हरी चार्जेस (Delivery charges) जोडले तर हाच दर 928 रूपयांवर जावून पोहचला आहे.

1 जानेवारी 2021 रोजी गॅस सिलेंडरसाठी नगरमध्ये जवळपास सातशे रूपये मोजावे लागत होते. मात्र आठ महिन्यात यात मोठी वाढ झाली आहे. सध्या करोना संकटामुळे (Corona crisis) अनेकांचे रोजगार गेले. अनेकांच्या उत्पन्नात घट झाली. मात्र सरकारी इंधन कंपन्यांकडून महागाईचा मारा सुरूच आहे. पेट्रोलने विक्रमी 108 रूपयांचा दर गाठला तर डिझेलनेही (Disel rate) शंभरीकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. या इंधन दरवाढीचा (Fuel price hike) फटका वाहतुकीला बसल्याने जीवनाश्यक वस्तूंचे दरही भडकले आहेत. त्यात आता गॅस दरवाढ असह्य असल्याच्या प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.

Visual Story : वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी सिद्धार्थ शुक्लाचे ‘हार्ट अ‍ॅटॅक’ने निधन; जाणून घ्या, तरुण या रोगाला का पडताय बळी?

नेते गप्प का?

आधी इंधन दरात 1 रूपयाने वाढ झाली तरी राजकीय पक्ष गल्लीबोळात गोंधळ घालत असल्याचे चित्र दिसायचे. मात्र आता विरोधक असो की सत्ताधारी पक्ष महागाईवर आंदोलन करताना दिसत नाही. मतांसाठी हात जोडणार्‍यांनी सध्या महागाईच्या प्रश्नावर तेच हात तोंडावर ठेवल्याने नागरिकांमध्ये या नेत्यांबद्दलही तीव्र संताप आहे. आधीच आर्थिक संकटाशी सामना करणार्‍या नागरिकांना सरकार महागाईत भाजून काढत असल्याची भावना आहे.

गॅस सिलिंडरच्या दरात खूप दरवाढ झाली आहे. आधीच करोनाने आर्थिक कंबरडे मोडल्याने जमा-खर्चाचा ताळमेळ बसत नाही. सरकारने जीवनाश्यक वस्तूंचे दर कमी करावेत. करोना संकटात सरकारने जनतेला दिलासा देण्याऐवजी केलेली गॅस दरवाढ निषेधार्ह आहे.

रिना सचिन क्षेत्रे, गृहिणी

सरकार जनतेचा अंत पाहत आहे की काय, असे सध्याच्या महागाईवरून वाटते. खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सरकारने गॅस सिलेंडरचे अनुदान बंद बंद केले आहे. त्यात आता सिलेंडरचे भाव आणखी 25 रुपयांनी वाढले आहे. सरकार सामान्यांचा विचार कधी करणार?

सविता सुतार, गृहिणी

- Advertisment -

ताज्या बातम्या