Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाभारत-विंडीज मालिकेवर करोनाचे संकट?

भारत-विंडीज मालिकेवर करोनाचे संकट?

मुंबई | Mumbai

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची (South Africa) मालिका आटोपून मायदेशी परतल्यानंतर टीम इंडिया (Team India) फेब्रुवारी महिन्यात मायदेशात विंडीजविरुद्ध (West Indies) तीन टी २० (T 20) आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका (One Day Series) खेळणार आहे…

- Advertisement -

मात्र भारतात (India) सध्या करोना (Corona) आणि ओमायक्रॉन (Omicron) विषाणूने कमालीचा धुमाकूळ घातला आहे. भारत आणि विंडीज यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या मालिकेचे वेळापत्रक बीसीसीआयने (BCCI) जाहीर केले आहे.

ही मालिका दि. ६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. एकदिवसीय मालिका सुरुवातीला होईल. मालिकेसाठी ६ ठिकाणं बीसीसीआयने (BCCI) निवडलेली आहेत. तिरुअनंतपुरम (thiruvananthapuram), कोलकाता (Kolkata), जयपूर (Jaipur), विशाखापट्टणम (Visakhapatnam), कटक (Cuttack) आणि अहमदाबाद (ahmedabad) येथे हे खेळवण्यात येणार आहेत. अहमदाबाद येथील सामन्याने एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल.

भारतात करोनाचा (Corona) विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय सर्व ६ सामन्यांचे आयोजन ३ शहरांमध्ये करण्याची शक्यता आहे. १ फेब्रुवारीला विंडीज संघ भारताविरुद्ध मालिकेसाठी भारतात दाखल होणार आहे. त्यानंतर ते ३ दिवस विलगीकरणात राहणार आहे.

हॅमस्ट्रिंग दुखापतीनंतर भारतीय एकदिवसीय आणि टी २० सामन्यांचा नवीन कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करण्याची शक्यता आहे. रोहित शर्माच्या पुनरागमनाची प्रतीक्षा भारतीय चाहत्यांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून लागून आहे. विंडीजविरुद्ध रोहित शर्मा परतल्यास भारतीय चाहत्यांचा आंनद द्विगुणित होईल.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या