Monday, May 27, 2024
Homeनाशिकगावांकडे वाढतोय करोनाचा संसर्ग; ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

गावांकडे वाढतोय करोनाचा संसर्ग; ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

ओझे l Oze (वार्ताहर)

दिंडोरी तालुक्यात गेल्या नऊ ते दहा महिन्यापासून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जनतेने चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे गावाकडे करोनाचा फैलाव क्वचित झाला होता.

- Advertisement -

मात्र आता ग्रामिण भागातील जनतेचे हळूहळू गावाबाहेर जाणे येणे वाढल्यामुळे करोनाचे रुग्णही आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. जनतेमध्ये करोनाचे गांभीर्य न राहिल्यामुळे आता खेड्यामध्ये करोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. त्यात तालुक्यातील ६० गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुका असल्यामुळे नागरिक नियमाचे पालन करणार का? हा एक चिंतेचा विषय ठरला आहे.

ग्रामपंचायत निवडणुका असल्यामुळे गावातील नागरिक प्रचार किंवा कागदपत्राची पुरतता करण्यासाठी बाहेर पडणार आहे. त्यामुळे लोकांनी शासनाच्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. त्यात मास्क, सेनिटॉयझर, सुरक्षित अंतर या बाबीचा विचार न झाल्यास यांचा त्रास अनेकांना होऊ शकतो.

यासाठी दिंडोरी तहसिल कार्यालय, प. समिती मध्ये मास्क नसलेल्या नागरिकांना प्रवेश नाकारण्यात येवून गर्दी न होऊ देणे या बाबीचा प्रशासनासह जनतेने दक्षता घेतली पाहिजे. तालुक्याच्या अनेक गावामध्ये आतापर्यत करोनाचा फैलाव झालेला नव्हता मात्र गेल्या १५ ने १० दिवसापासून कोरोना रुग्णनाची संख्या वाढताना दिसून येत आहे.

निवडणुक कोणतीही असो लोकसभा, विधानसभा, जि. परिषद, प. समिती, नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत या मध्ये उमेदवाराला प्रत्येक कार्यकत्याला सांभाळण्यासाठी पार्ट्या या द्याव्याच लागतात मात्र सध्याची परिस्थिती खूप वेगळी असून उमेदवारासह कार्यकत्यांनी निवडणुकीत काळजी न घेतल्यास करोनाचा संसर्ग वाढू शकतो.

त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांनी प्रचार किंवा अन्य कारणासाठी बाहेर गेल्यास काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे अनेक गावानी या निवडणुकीचा धसका घेतल्यांचे चित्र दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या