Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशदिलासा! देशात करोना रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला; मृतांच्या संख्येतही मोठी घट

दिलासा! देशात करोना रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला; मृतांच्या संख्येतही मोठी घट

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, करोना महामारीची दुसरी लाट हळू-हळू ओसरत असल्याचं चित्रं आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्यानं घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच मृताची संख्याही घटत असल्याचेही समोर आलं आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत १ लाख ३४ हजार १५४ नवे करोना रुग्ण आढळले असून २ हजार ८८७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ८४ लाख ४१ हजार ९८६ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ लाख ३७ हजार ९८९ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात २ लाख ११ हजार ४९९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ६३ लाख ९० हजार ५८४ वर पोहचली आहे.

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण २२ कोटी १० लाख ४३ हजार ६९३ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील २४ लाख २६ हजार २६५ लसीचे डोस बुधवारी देण्यात आले.

ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, २ जून २०२१ पर्यंत देशात एकूण ३५ कोटी ३७ लाख ८२ हजार ६४८ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. यातील २१ लाख ५९ हजार ८७३ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात करण्यात आली.

महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये करोना रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात बुधवारी जवळपास १५ हजार रुग्ण आढळले आहेत. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात नवीन करोना रुग्ण आढळण्याची संख्या ५० हजारांपेक्षा जास्त होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या