Saturday, May 18, 2024
Homeजळगावभुसावळ तालुक्यात कोराेनाचा शिरकाव

भुसावळ तालुक्यात कोराेनाचा शिरकाव

जळगाव – jalgaon

राज्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई, पुण्यानंतर आता जळगाव जिल्ह्यात देखिल कोरोना बाधित रूग्ण आढळून आला आहे. भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे पानाचे या गावातील एक जण कोरोना बाधित असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

- Advertisement -

सदर रूग्ण हा नेपाळ येथे प्रवास करून असल्याची माहिती आहे. दरम्यान या रूग्णाची प्रकृती चिंताजनक नसून त्यांच्या संपर्कातील इतर १४ जणांची कोरोना तपासणी निगेटीव्ह असल्याचेही प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यात कोरोना तपासण्या सुरू झाल्या असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. राज्यात सर्वाधिक २० टक्के कोविड तपासण्या ह्या जळगाव जिल्ह्यात झाल्या असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या