धुळे – Dhule – प्रतिनिधी :
जिल्ह्यात एकाच दिवशी 82 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दोन हजार 584 एवढी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
शहरातील दोन खाजगी लॅब येथील वीस अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात मयुर कॉलनी दोन, गुरुदत्त नगर दोन, श्रीरंग कॉलनी दोन, सराफ बाजार दोन, चितोड रोड, अजय नगर, पारिजात कॉलनी, म्हाडा चाळीसगाव रोड, रुपामाई शाळेजवळ, डोंगरे महाराज नगर, एसीपीएम कॉलेज, नरडाणा, सुलवाडे पाटण, दह्याणे आणि देऊळ प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील नऊ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात सिध्दार्थ नगर दोन, हुडको कॉलनी, हस्ती कॉलनी, भतवाल टॉकी, पासवनाथ नगर, दत्त कॉलनी, डाबरी, चिमठाणे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
धुळे जिल्हा रुग्णालय येथील दहा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शासकीय गोदाम तीन, भाईजी नगर, मिलींद सोसायटी, गल्ली नंबर 5, कालिकादेवी नगर, सोनगीर, मुकटी प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात क्रांतीनगर आणि शिरपूर प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
जिल्हा रुग्णालय येथील पाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात भाईजी नगर, अजबे नगर, विशाल कंपाऊंड साक्री रोड, लक्ष्मी नगर, सोनगीर प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 36 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. व इतर जिल्ह्यातील चार अहवाल देखील पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात भीम नगर एक, देवपूर सहा, दोंदे कॉलनी एक, ग.नं. 6 मधील दोन, मोतीनगर एक, सेवा हॉस्पीटल आठ, इतर धुळे दहा या रुग्णांचा समावेश आहे. तसेच फागणे एक, साक्री दोन, शिरपूर दोन, जीएमसी एक, थाळनेर एक रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात बाधितांची संख्या 2584 झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू लागू केला आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला आहे.