Saturday, July 27, 2024
Homeराजकीयकरोनाचा वैद्यकीय प्रतिपुर्तिच्या यादित समावेश करावा

करोनाचा वैद्यकीय प्रतिपुर्तिच्या यादित समावेश करावा

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

शासकीय कर्मचारी तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तिच्या मंजुरी संदर्भात महाराष्ट्र राज्य वैद्यकीय सेवा देखभाल नियम १९६१ व त्या संदर्भात वेळोवळी निर्गमित संदर्भ शासननिर्णया मधील तरतुदीच्या आधीन राहून आकस्मिक उद्भवणाऱ्या २७ आकस्मिक ५ गंभीर आजारावर खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचारांवरील परिगणना वैद्यकीय देयकाने करण्यात येते.

- Advertisement -

सध्या करोना महामारीचे संकट संपुर्ण महाराष्ट्र भर आहे. शासकीय अधिकारी /कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्मचारी या महामारीच्या निर्मुलनासाठी विविध पातळीवर काम करत आहेत. त्यातून अनेक कर्मचाऱ्यांना बाधा झालेली आहे.शासकीय कर्तव्य पार पडतांना रोगाची लागण झाल्यास सध्या बेडचा तुटवडा व इतर अत्यावश्यक बाबीसाठी कर्मचाऱ्यांना खाजगी रूग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. कोव्हीड -१९आजाराचा वैद्यकीय प्रतिपूर्ती साठी शासनाने विर्निदिष्ट आजारामध्ये समावेश नसल्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्ती अंतर्गत सद्यस्थितीत गंभीर आजाराच्या यादीत कोव्हीड -१९चा समावेश करावा अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचेकडे केल्याची माहिती राज्य अध्यक्ष देविदास बस्वदे, सरचिटणीस कल्याण लवांडे यांनी दिली.

याव्यतिरिक्त सारी, स्वाईन फ्लू, लिव्हर प्रत्यारोपण, डेंग्यू, सोरायसिस इ. रोगांचा समावेश करण्याबाबत विनंती केली आहे.या मागणीचे स्वागत ,राज्य उपाध्यक्ष सुनील जाधव,राज्य संघटक राजेंद्र निमसे यांच्यासहअहमदनगर संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, जिल्हा सरचिटणीस सुनिल शिंदे, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड, शरद वांढेकर, सुरेश नवले, रा.गी.ढाकणे, राजकुमार शहाणे,संजय शेळके, विष्णू चौधरी, दत्तात्रय परहर, राविष्णू बांगर,प्रदिप चक्रनारायण, संदीप भालेराव,संजय सोनवणे,शिवाजी ढाकणे, बापूराव वावगे,महेश लोखंडे , संभाजी तुपेरे, विलास लवांडे, रविंद्र अनाप, सुधीर बोऱ्हाडे, जनार्दन काळे, ज्ञानदेव कराड, लक्ष्मण चेमटे, सचिन ठाणगे, शहाजी जरे,पांडुरंग देवकर ,भारत शिरसाठ,अनिल शिरसाठ, राजेंद्र खंडागळे, सचिन शेरकर, आदिनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या