नवी दिल्ली | New Delhi
31 मार्च रोजी भव्य उद्घाटन सोहळ्यानंतर आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला धमाकेदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचे आतापर्यंत सहा सामने खेळवले गेले आहेत.
भारतात आयपीएलची (IPL 2023) मोठी क्रेझ असताना, आयपीएल 2023 वर कोरोनाचे सावट आले आहे. स्पर्धेतील एका दिग्गजाला कोरोनाची लागण झाली आहे.
मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू
इंडियन प्रीमिअर लीग 2023 (IPL 2023) दरम्यान टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोपडा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आकाश चोपडा यांनी (Aakash Chopra) स्वत: ही माहिती दिली आहे.
कोरोनाची लागण झाल्याने आयपीएलमध्ये काही दिवस समालोचन करु शकत नसल्याचं त्यांनी सांगितले आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
आकाश चोपडाने समाज माध्यमाद्वारे याबाबत माहिती दिली असून, त्यात म्हटले आहे की, “कोविडने पुन्हा एकदा धडक दिली आहे. काही दिवस कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसणार नाही. पण लवकरच परत येईल.”