Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशCorona Update : देशातील नव्या बाधितांमध्ये थोडी वाढ, वाचा ताजी आकडेवारी

Corona Update : देशातील नव्या बाधितांमध्ये थोडी वाढ, वाचा ताजी आकडेवारी

दिल्ली l Delhi

- Advertisement -

संपूर्ण जगात करोनाचा (COVID19) शिरकाव झाल्यापासून करोनाने भारतातही कहर माजवला होता. जगात सर्वात जास्त रुग्ण असणाऱ्या काही देशात भारताचा समावेश होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या (COVID19) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

गेल्या २४ तासात भारतात १४ हजार ६२३ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १९७ रुग्णांना प्राण गमवावे लागले. काल दिवसभरात देशात १९ हजार ४४६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. देशभरात सध्या १ लाख ७८ हजार ०९८ सक्रिय करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशभरात ०४ लाख ५२ हजार ६५१ जणांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

दरम्यान, करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम देशभरात वेगाने सुरू आहे. लवकरच भारत १०० कोटी डोसचा टप्पा गाठणार आहे. आतापर्यंत ९९ कोटी १२ लाख ८२ हजार २८३ जणांना लस देण्यात आली आहे. मागील २४ तासांत ४१ लाख ३६ हजार १४२ जणांना लस दिली गेली.

- Advertisment -

ताज्या बातम्या