Monday, April 28, 2025
Homeदेश विदेशCorona Update : देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाखांवर, महाराष्ट्रातील स्थिती काय?

Corona Update : देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाखांवर, महाराष्ट्रातील स्थिती काय?

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा कहर पाहायला मिळत असून दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या करोना बाधितांच्या संख्येत २ हजारांनी घट झाली आहे. मात्र सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढताना असल्यामुळे भारतात करोनाची तिसरी लाट येण्याची भीती वाढत आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ४५ हजार ३५२ जणांना करोनाचा (COVID new patient today) संसर्ग झाला आहे. त्यामुळे, देशात सद्यस्थितीत करोनावर उपचार घेणाऱ्यांचा (Corona active patient) एकूण आकडा ३ लाख ९९ हजार ७७८ वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे याच २४ तासांत देशात ३४ हजार ७९१ जण करोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनामुक्त झालेल्यांची संख्या आता ३ कोटी २० लाख ६३ हजार ६१६ वर पोहोचली आहे.

देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी २९ लाख ०३ हजार २८९ करोना रुग्णांची नोंद (Corona cases in india) झाली आहे. तर, गेल्या २४ तासांत देशात ३६६ इतक्या लोकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे, देशातील करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा आता ४ लाख ३९ हजार ८९५ वर (Corona death in india) पोहोचला आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Coronavirus Maharashtra Highlights)

राज्यात काल ४ हजार ३४२ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ७५५ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ८१ हजार ९८५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे. राज्यात काल ५५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Onion Price : वांबोरीत कांद्याला मिळतोय हा भाव

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri सोमवार दि. 28 एप्रिल रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Onion Market) झालेल्या कांदा लिलावात 3 हजार 48 कांदा गोण्याची आवक झाली. एक...