Friday, May 3, 2024
Homeनाशिकलसीकरणापासून ७ हजार लाभार्थी दूरच; पहिला टप्पा यशस्वी करण्यासाठी धडपड

लसीकरणापासून ७ हजार लाभार्थी दूरच; पहिला टप्पा यशस्वी करण्यासाठी धडपड

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात करोना लसीकरणाचे पवहिल्सर टप्प्यातील उदिष्ट महिनाभरानंतरही पुर्ण झालेले नाही. अद्याप 5 हजार लाभार्थी लसीकरणापासून दूर असल्याचे चित्र आहे…

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात करोना लसीकरण मोहिमेस 16 जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आला आहे. यासाठी सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया, पुणे कंपनीने तयार केलेल्या ‘कोविडशिल्ड’ या लसीचे जिल्ह्याला 43 हजार 440 डोसेजेस प्राप्त झाले आहेत.

कोविड लसीकरणाच्या पहिल्या फेरीत लसीकरणासाठी जिल्ह्यातून 36 हजार 720 आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचार्‍यांची नोंदणी करण्यात आली आहे.

यातील एका व्यक्तिला दोन डोस याप्रमाणे पहिल्या फेरीत 19 हजार 548 हेल्थ केअर वर्करला लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणाअंतर्गत गर्भवती महिला व स्तनदा माता यांना लसीकरण करण्यात येणार नाही.

तसेच लसीकरणासाठी जिल्ह्यात प्रथम 13 तर नंतर त्यात वाढ करून 29 केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या एका केंद्रावर एका दिवसात 1 हजार 300 डोसेजेस देण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले होते.

लसीकरणाच्या प्रक्रीये दरम्यान लसीकरणानंतर अतिदक्षतेची परिस्थिती निर्माण झाल्यास पूर्व प्रत्येक केंद्रावर 102 व 108 या अम्बुलन्सची सेवा 24 तासांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या अनुषंगानेच लसीकरणानंतर लाभार्थ्याला परिक्षण कालावधी दरम्यान काही विपरीत परिणाम जाणवल्यास पुढील उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालय, संदर्भसेवा रूग्णालय, एनडीएमव्हीपी मेडिकल कॉलेज नाशिक व एसएमबीटी धामणगाव या रूग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे.

त्याप्रमाणे जिल्हा व तालुकापातळीवर लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे.

परंतु लसीकरणाबाबात अनेकांकडून शंका व्यक्त केली जात असल्याने तसेच इतर कारणांनी यास अल्प प्रतिसाद लाभत आहे. याच्या परिणामी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 36 हजार 720 उद्दीष्टापैकी 29 हजार 600 लसीकरण पूर्ण झाले आहे. तर अद्याप 7 हजार 120 लाभार्थी लसीकरणापासून दूर आहेत.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 36 हजार 720 उद्दीष्टापैकी 29 हजार 600 लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यात 29 केंद्र सुरू असून या केंद्रांवर आठवड्यातील पाच दिवस लसीकरण करण्यात येत आहे. 10 मार्च पर्यंत लसीकरणाचा पहिला टप्पा शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मालेगावं येथे लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी तेथील धर्मगुरूं तथा मौलवी यांची मदत घेण्यात येत आहे. लसीकरण शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.

सुरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या