Thursday, March 27, 2025
Homeदेश विदेशवाहन कंपन्या बनवणार व्हेंटिलेटर्स

वाहन कंपन्या बनवणार व्हेंटिलेटर्स

नवी दिल्ली – कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने वाहनांची निर्मिती करणार्‍या कंपन्यांना आपल्याकडे असणार्‍या सुविधांचा वापर व्हेंटिलेटर्स तयार करण्यासाठी करावा असे निर्देश दिले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाग्रस्तांसाठी देशभरातील वेगवेगळ्या रुग्णालयांम्ये 14 हजार व्हेंटिलेटर्स उपलब्ध असून जवळपास 12 लाख एन-95 मास्क स्टॉकमध्ये आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये पाच लाख मास्कचं वाटप करण्यात आलं.

- Advertisement -

तर वाहन कंपन्यांना व्हेंटिलेटर्सची निर्मिती करण्यास सांगण्यात आलं असून त्यादृष्टीने काम सुरु आहे. याशिवाय मंत्रालयाने आधीच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला 30 हजार व्हेंटिलेटर्सची निर्मिती करण्याचा आदेश दिला आहे.

नोएडा येथील आगवा हेल्थकेअरला एका महिन्यात 10 हजार व्हेंटिलेटर्स तयार करण्यास सांगण्यात आलं आहे. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात त्यांचा पुरवठा सुरु होईल. दोन स्थानिक कंपन्या दिवसाला 50 हजार एन-95 मास्कची निर्मिती करत असून हा आकडा एका आठवड्यात एक लाख इतका जाऊ शकतो.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मेक इन इंडिया भारतीयत्वाचं ‘इमोशन’ !

0
अहिल्यानगर | Ahilyanagar| अनंत पाटील ‘मेक इन इंडिया’ ही भावना आहे, असे मी नेहमी मानतो. त्याकडे स्कीम म्हणून पाहू नये, ते एक प्रकारे भारतीयत्वाचं इमोशन...