Friday, June 13, 2025
Homeनाशिककरोनाबाधित एसटी कर्मचा-यांना मिळणार वैद्यकिय खर्च

करोनाबाधित एसटी कर्मचा-यांना मिळणार वैद्यकिय खर्च

मुंबई । Mumbai

- Advertisement -

करोनाची लागण झाली आहे, अशा एसटी महामंडळातील अधिकारी-कर्मचा-यांनाही आता वैद्यकिय उपचाराचा खर्च मिळणार आहे. ०२ सप्टेंबर २०२० पासून वैद्यकिय उपचारासाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

सरकारी कर्मचा-यांच्या विविध आजारांच्या उपचारांसाठी होणा-या वैद्यकिय खर्चाची प्रतिपूर्ती सरकारकडून केली जाते. अशा ‍विविध 27 आकस्मिक आजारांमध्ये कोविड-19 या आजाराचा नुकताच समावेश करण्यात आला आहे.

शासनाने ‍ दिलेल्या मान्यतेनुसार वैद्यकिय प्रतिपूर्तीसाठी वेळोवेळी केलेले बदल हे राज्य ‍ परिवहन महामंडळासाठीही लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार एसटी महामंडळातील अधिकारी-कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय कोविडचा संसर्ग होऊन आजारी पडल्यास त्यासाठी होणा-या वैद्यकिय खर्चाची प्रतिपूर्ती महामंडळाकडून देण्यात येणार आहे.

हा निर्णय 2 सप्टेंबर 2020 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहील. या संदर्भातील परिपत्रक कर्मचारी वर्गाचे महाव्यवस्थापक माधव काळे यांनी जारी केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

बेशिस्त

Nashik News: बेशिस्त पार्किंग, अनधिकृत गाड्या, विक्रेत्यांमुळे शहराचा चेहरा बकाल; आ....

0
नाशिक | प्रतिनिधी शहरातील द्वारका, मुंबई नाका तसेच इतर प्रमुख चौक व रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे नाशिक शहराचा चेहरा बकाल होत आहे. बेशिस्त पार्किंग, अनधिकृत...