मुंबई | Mumbai
देशभरात करोनाने थैमान घातले आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या विळख्यात अनेक नेते, सेलेब्रिटी येत आहेत.
- Advertisement -
दरम्यान तेलुगु अभिनेता अल्लू अर्जुनला करोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वतः अल्लू अर्जूनने दिली आहे. त्याने सोशल मीडियावर आपण क्वारंटाईन असल्याची माहिती दिली आहे. चाहत्यांना हा खूप मोठा धक्का आहे.
अल्लू अर्जुनने ट्विट करत म्हटलंय की, ‘सगळ्यांना नमस्कार! माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. मी त्या सगळ्यांना विनंती करतो जे माझ्या संपर्कात आले आहे. त्यांनी आपली काळजी घ्यावी. चाचणी देखील करून घ्या. मी सगळ्या शुभचिंतकांना आणि चाहत्यांना विनंती करतो की, घरी राहा सुरक्षित राहा.’ असे त्यांनी म्हंटल आहे.