Tuesday, November 26, 2024
Homeदेश विदेशदेशात दररोज 15 हजार कोरोना टेस्ट – आरोग्य मंत्रालय

देशात दररोज 15 हजार कोरोना टेस्ट – आरोग्य मंत्रालय

 सार्वमत

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा कहर सुरुच असून सध्या दररोज देशात 15 हजार कोरोनाच्या टेस्ट करण्यात येत आहे. यासाठी खासगी लॅबची मदत घेतली जात आहे. गेल्या 24 तासांत भारतात 32 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून मागील 24 तासांत 773 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने देण्यात आली. आरोग्य मंत्रालय तसेच गृहमंत्रालयाच्यावतीने संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारकडून करण्यात येणार्‍या उपायांची माहिती देण्यात आली. सध्या देशात सर्वत्र हवाई दलाच्या मार्फत औषधे पोहोचविण्याचे काम सुरु झाले आहे.

- Advertisement -

दिल्लीतील एम्सच्या माध्यामतून देशभरातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याचेही काम सुरु आहे. यावेळी डॉक्टर्स आणि तमाम आरोग्य कर्मचार्‍यांना आवश्यक उपकरणे दिली जातील असे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले आहे. सध्या होम क्वॉरंटाईन असणार्‍यांची नियमित तपासणी होत असल्याचे यावेळी आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.सध्या भारतात दररोज 15 हजार टेस्ट केल्या जात आहेत. यासाठी खासगी लॅबचीही मदत घेतली जात आहे. शिवाय तात्पुरत्या स्वरुपात रुग्णालये उभारण्याचे ही काम युद्धपातळीवर होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 773 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 5194 वर पोहोचला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.दरम्यान देशात जिथे जिथे कोरोना संदर्भातील हॉटस्पॉट ठिकाणे व परिसर आहे त्या ठिकाणचा लॉकडाऊन तेथील राज्य सरकारकडून वाढविण्यात आला आहे. सुरक्षेसंदर्भातील सर्व त्या उपाययोजना व खबरदारी घेण्यात येत असल्याचे गृहमंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे. तसेच केंद्राने बांधकाम मजुरांसाठी विशेष निधी जाहीर केला असून 2 हजार मजुरांना या निधीचे वाटप करण्यात आले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या