Tuesday, November 26, 2024
Homeदेश विदेशकोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू

कोरोना : अमेरिकेत 24 तासांत 345 मृत्यू

सार्वमत

एक लाखांपेक्षा अधिक बाधित
वॉशिंग्टन – कोरोनामुळे अमेरिकेत शुक्रवारी एकाच दिवसात 345 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाबाधितांच्या संख्या वाढत असून तब्बल एक लाखाहून अधिकजणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisement -

चीनच्या वुहान शहरातून संसर्ग सुरू झाल्यानंतर कोरोना विषाणू जगभरात फैलावत आहे. युरोपीयन देशांसह अमेरिकेतही कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने होत आहे.  कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी अब्जोवधींची तरतूद अमेरिकन सरकारने केली आहे. अमेरिकेत एक लाख चार हजार 256 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, 1704 जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या ही इटलीपेक्षा 15 हजार आणि चीनपेक्षा 20 हजाराहून अधिक आहे. सध्या तरी मृत्यूदर कमी असल्याचे चित्र आहे. इटलीत कोरोनाबाधितांचा मृत्यू दर 10.5 टक्के आहे. तर, अमेरिकेत 2.5 टक्के आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा सर्वाधित संसर्ग झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 606 जणांनी प्राण गमावले आहेत. तर, 46 हजारहून अधिकजणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
कोरोना संसर्गाचे नवे केंद्र अमेरिका बनले आहे. वेगाने फैलावलेल्या कोरोनामुळे महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील दोषही समोर आले आहे. न्यूयॉर्कमध्ये आरोग्य कर्मचार्‍यांची कमतरता भासत आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सेवेत रुजू होण्यास सांगितले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या