Sunday, November 17, 2024
Homeमुख्य बातम्यापुण्यात मास्क न घातल्यास मोठा दंड

पुण्यात मास्क न घातल्यास मोठा दंड

पुणे

करोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना मोठा दंड करण्याचा मानस असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले

- Advertisement -

पिंपरी येथे कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.पवार म्हणाले, महाराष्ट्रात काही ठिकाणी नागरिक मास्क वापरत नसल्याचे दिसून येते.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क न वापरणाऱ्यांना १००० रुपये दंड करण्याचा विचार अाहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढले आहे. मात्र तरीही नागरिक आवश्यक ती काळजी घेत नाही. मास्क वापरण्यासाठी वारंवार सूचना दिल्यानंतर देखील लोक मास्क वापरत नाहीत आणि त्यामुळे आता दंडाची रक्कम ५०० रुपयावरुन १००० वाढवावी लागेल असे पवार यांनी म्हटले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या