नवी दिल्ली – जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, कोरोना विषाणू अनेक तास हवेत जिवंत राहू शकतो. जागतिक आरोग्य संघटना व अमेरिका रोग नियंत्रण आणि प्रतिबंद केंद्र यांनी याआधी सोशल डिन्स्टन्सिंगसंबंधी दिलेले निर्देश पर्याप्त नाहीत. कारण, खोकल्यातून किंवा शिंकेतून करोना विषाणू तब्बल 8 मीटरचं अंतर गाठू शकतो व लोकांना संक्रमित करू शकतो.
अहवालानुसार, या अगोदर करोनाशी व्हायरसबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं सोशल डिन्स्टन्सिंग (सामाजिक अंतर) संदर्भात जारी केलेले दिशा-निर्देश पर्याप्त नाहीत. कारण, खोकल्यातून किंवा शिंकेतून करोना विषाणू तब्बल 8 मीटरचं अंतर गाठू शकतो.याअगोदर जारी करण्यात आलेले दिशा-निर्देश खोकला किंवा शिंक किंवा श्वसन प्रक्रियेद्वारे बनणार्या गॅस क्लाउडच्या 1930 च्या दशकातल्या जुन्या मॉडलवर आधारीत आहे. अभ्यासक आणि एमआयटीचे असोसिएट प्रोफेसर लीडिया बुरुइबा यांच्या म्हणण्यानुसार, खोकल्यातून किंवा शिंकेतून निघणारा सुक्ष्म द्रव 23 ते 27 फूट किंवा 7-8 मीटरपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे सोशल डिन्स्टन्सिंग पाळताना हे लक्षात घ्यायला हवं.
गर्दीपासून दूर रहा – गर्दीपासून दूर रहा आणि एकमेकांपासून कमीत कमी 1 मीटरचं अंतर राहील याची खात्री करा. करोना व्हायरस फैलावासंदर्भात आत्तापर्यंत जे अनुमान लावण्यात आलेत त्यापेक्षा ते अनेक पटींनी धोकादायक असल्याचं अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या अहवालात म्हटलं आहे.