Wednesday, March 26, 2025
Homeदेश विदेश…तर एकामुळे 406 जणांना होऊ शकतो कोरोना – आरोग्य मंत्रालय

…तर एकामुळे 406 जणांना होऊ शकतो कोरोना – आरोग्य मंत्रालय

लॉकडाऊन वाढवण्याबाबत कुठलाही निर्णय नाही
नवी दिल्ली – कोरोना रुग्णाने आयसीएमआरने दिलेल्या नियमांचे म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे आणि लॉकडाऊनचे पालन न केल्यास त्याच्यामुळे 30 दिवसांत किमान 406 जणांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

दरम्यान केंद्र सरकार लॉकडाऊन वाढवणार आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियातून सुरू आहे. या चर्चांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पूर्ण विराम दिला आहे. देशातील लॉकडाऊनबाबत अद्या कुठलाही निर्णय झालेला नाही. यांदर्भात निर्णय झाल्यावर त्याची माहिती तात्काळ दिली जाईल, असेही लव अग्रवाल म्हणाले.
ज्या परिसरांमध्ये किंवा भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत तिथे नियमांनुसार योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. याचे चांगले परिणामही समोर आले आहेत. आग्रा, गौतम बुद्ध नगर, भीलवाडा, पूर्व दिल्ली या भागात नाकाबंदीसह नियांचं पालन झाल्यानं तिथे प्रशासनाला कोरोनाला आळा घालण्यात यश आलं आहे.

- Advertisement -

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 4,421 वर गेली आहे. यात गेल्या 24 तासांतील 354 नव्या रुग्णांचाही समावेश आहे. तर आतापर्यंत 326 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 2500 डब्यांमध्ये रेल्वेकडून 40 हजार आयसोलेशन बेड तयार करण्यात येत आहेत. रेल्वेकडून दररोज 375 बेड तयार केले जात आहेत. याची तयारी देशातील 133 ठिकाणी सुरू आहे, असं अग्रवाल यांनी सांगितलं.
तर कोरोनाच्या आतापर्यंत 1,07,006 चाचण्या करण्यात आल्या आहेत. सरकारच्या 136 प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या सुरू आहेत. तसंच 59 खासगी प्रयोगशाळांनाही चाचण्यांची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती आयसीएमआरचे डॉक्टर रमन गंगाखेडकर यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...