पुणे –
पुणे शहरात आज दिवसभरात 1 हजार 55 नवे करोनाबाधित आढळले. तर,
38 रुग्णांचा मृत्यू झाला. आज अखेर शहरात 3 हजार 609 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्या 1 हजार 286 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आज अखेर 1 लाख 28 हजार 925 रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 598 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून,22 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, 816 जण आज करोनातून मुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 79 हजार 936 वर पोहचली असून यापैकी, 67 हजार 806 जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 हजार 466 असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.