Wednesday, September 11, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे –

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 1637 करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या

- Advertisement -

1 लाख 40 हजार 588 एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 3 हजार 332 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनावर उपचार घेणारे 1695 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर 1 लाख 19 हजार 577 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

तर पिंपरी-चिंचवडमध्ये आज दिवसभरात 1 हजार 151 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 65 जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 250 जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या 75 हजार 267 वर पोहचली असून यांपैकी, 61 हजार 870 जण करोनातून बरे झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्यार्‍या सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजार 773 एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या