Saturday, May 25, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई –

राज्यात मागील 24 तासांत 424 मृत्यूंची नोंद झाली आहे. मागील 24 तासांमध्ये 13 हजार 294 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर

- Advertisement -

15 हजार 591 नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 16 हजार 513 इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन एकूण 37 हजार 480 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 11 लाख 17 हजार 720 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात 2 लाख 60 हजार 876 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

13 हजार 294 रुग्णांना मागील चोवीस तासांमध्ये डिस्चार्ज मिळाला आहे. आत्तापर्यंत राज्यातल्या 11 लाख 17 हजार 720 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आत्तापर्यंत 69 लाख 60 हजार 203 नमुन्यांपैकी 14 लाख 16 हजार 513 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात 21 लाख 94 हजार 347 लोक होम क्वारंटाइन आहेत तर 29 हजार 51 लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

आज राज्यात 15 हजार 591 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 16 हजार 513 इतकी झाली आहे. मागील 24 तासांमध्ये राज्यात 424 मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 272 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 65 मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित 87 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीतले आहेत अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या