मुंबई –
महाराष्ट्रात सध्या 15 दिवसांची संचारबंदी सुरू आहे, मात्र तरी देखील रूग्ण संख्या वाढतच आहे. आज राज्यात 67 हजार 123 नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून 419 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
- Advertisement -
राज्यातील मृत्यू दर 1.59 टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत 59 हजार 970 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 6,47,933 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, आज उपचारानंतर बरे झालेल्या 56 हजार 783 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत एकूण 30,61,174 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 81.18 टक्के इतके झाले आहे.