Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

मुंबई / Mumbai – राज्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 13 हजार 452जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 7 हजार 761 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

याशिवाय राज्यात दिवसभरात 167 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख 26 हजार 727 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या 61 लाख 97 हजार 018 इतकी झाली आहे.

- Advertisement -

राज्यात आतापर्यंत एकूण 59 लाख 65 हजार 644 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 96.27 टक्के इतके झाले आहे.

राज्यात सध्या 1 लाख 1 हजार 337 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या