Sunday, May 26, 2024
Homeमहाराष्ट्रनवी मुंबईत आज ‘इतके’ नवे करोनाबाधित

नवी मुंबईत आज ‘इतके’ नवे करोनाबाधित

मुंबई –

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची एकूण संख्या 37 हजाराच्याही पुढे गेली असून, शहरात आतापर्यंत

- Advertisement -

एकूण 770 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे शहरात करोनामुक्तीचा दर 88 टक्क्यांवर पोहचला आहे. शहरात आजपर्यंत एकूण 37 हजार 817 करोनाबधित आढळले आहेत. तर, आज शहरात 399 नवे करोनाबधित रुग्ण

आढळले आहेत.शहरात करोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या 37 हजाराच्या पुढे गेली आहे. आज शहरात सात रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, करोनामुळे मृत झालेल्यांची एकूण संख्या 770 झाली आहे. शहरात 3 हजार 694 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण 2 लाख 6 हजार 832 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून, करोनामुक्तीचा दर वाढला आहे. शिवाय, शहरातील मृत्यू दर कमी झालेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या