Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

पुण्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

पुणे –

शहरातील एकूण करोना रुग्णांची संख्या 1 लाख 37 हजार 330 एवढी झाली आहे. आज दिवसभरात

- Advertisement -

नव्याने 1512 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 42 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आज अखेर 3 हजार 255 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनावर उपचार घेणार्‍या 1328 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी त्या सर्वांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आज अखेर 1 लाख 16 हजार 626 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात नव्याने 784 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर 30 रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 1 हजार 559 रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 73 हजार 260वर पोहचली असून यांपैकी, 59 हजार 544 जण करोनातून बरे झाले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजार 63 एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या