Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात 1165 नवे करोना रुग्ण, 48 मृत्यू, बाधितांची संख्या 20 हजार 200...

राज्यात 1165 नवे करोना रुग्ण, 48 मृत्यू, बाधितांची संख्या 20 हजार 200 च्या वर

सार्वमत 

मुंबई – महाराष्ट्रात आज दिवसभरात करोनाचे 1165 नवीन रुग्ण आढळले असून करोनाबाधित एकूण रुग्णांचा आकडा आता 20 हजार 228 इतका झाला आहे. तर गेल्या 24 तासांत करोनामुळे 48 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या आता 779वर पोहचली आहे. राज्यात आज 330 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 3800 रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisement -

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 27 हजार 804 नमुन्यांपैकी 2 लाख 06 हजार 481 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 20 हजार 228 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 41 हजार 290 लोक होम क्वारंटाइनमध्ये असून 13 हजार 976 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 21 पुरुष तर 27 महिला आहेत. आज झालेल्या 48 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 27 रुग्ण आहेत तर 18 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 3 जण 40 वर्षांखालील आहे. रुग्णांना असणार्‍या इतर आजारांबाबत 9 जणांची माहिती प्राप्त झालेली नाही. उर्वरित 39 रुग्णांपैकी 28 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या