Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे : 15 मे पर्यंत करोनाग्रस्तांचा आकडा 3 हजार होणार?

पुणे : 15 मे पर्यंत करोनाग्रस्तांचा आकडा 3 हजार होणार?

सार्वमत

पुणे (प्रतिनिधि) – पुण्यातील करोनाव्हायरसचा प्रादुर्भाव काही केल्यानं आटोक्यात येताना दिसत नाही. दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढतोच आहे. आता तर करोनाबाधित रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून या आठवड्याच्या शेवटी पंधराशे आणि 15 मे पर्यंत तीन हजार पर्यंत रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं प्रशासनाच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

- Advertisement -

याबाबत पुणे महापालिका आयक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कुटुंबातील किमान सहा सदस्य बाधित धरले जातात. तर पहिल्या संपर्कातील 10 ते 12 जणांची करोना तपासणी केली जात आहे. 15 मी पर्यंत याप्रमाणे तीन हजार करोनाबाधित रुग्णांची संख्या होण्याची शक्यता आहे. माञ इतर शहरांच्या तुलनेत परिस्थिती नियंत्रणात आहे. मॅथेमॅटिक मॉडेल प्रमाणं अपेक्षित तेवढी रुग्ण वाढले नसल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केले.

गायकवाड म्हणाले, दर आठवड्याला दोन नवीन रुग्णालयाशी करार केले जात आहेत. मागच्या आठवड्यात भारती रुग्णालय 150 आणि सिम्बॉयसिस बरोबर 500 बेडचा करार केला. या आठवड्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि सह्याद्री हॉस्पिटल तर पुढील आठवड्यात पुणे स्टेशनला दीडशे बेडचा करार केला. सीओईपी हॉस्टेलमध्ये 800 बेडच हॉस्पिटल तयार करण्याचा विचार आहे. आता सध्या 14 खाजगी रुग्णालयात पेशंट आहे.

रूग्णांची संख्या वाढणार असल्यानं 74 वसतिगृह अधिग्रहित केलेत. आपली 43 हजारांची क्षमता असून 300 शाळांत ही व्यवस्था करण्याच नियोजन आहे. त्यामुळं आणखी वीस हजार नागरिकांची सोय होईल, असेही आयुक्तांनी सांगितलं. सिंहगड इन्स्टिट्यूट 2200 खोल्या आणि बालेवाडीचा अकराशे रूम उपलब्ध आहेत असे त्यांनी सांगितले.

चाचण्या करण्याची संख्या वाढवल्याने करोना बाधित रूग्ण सापडत आहे – जिल्हाधिकारी
दरम्यान, शहरात आरोग्य चाचण्या करण्याची संख्या वाढवल्याने करोना बाधित रूग्ण सापडत आहे. त्यामुळे एकूण संख्येत वाढ होत आहे, मात्र बरे होणार्‍या रूग्णांचे प्रमाणही वाढत आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केले.
ते म्हणाले,पूर्व भागात आरोग्य तपासणी करण्याची संख्या वाढवली आहे. पुरूषांच्या बरोबरीने महिला रूग्णही सापडत आहेत. आजार लपवण्याची किंवा अंगावर काढण्याची त्यांची प्रवृत्ती असल्याने हे होत आहे. कोणीही रूग्ण तपासणीविना राहू नये, त्याच्यापासून कोणाला संसर्ग होऊ नये यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून बाधित सापडत असल्याने प्रशासनाचा हेतू साध्य होत आहे. पण संख्या वाढत असल्याने नागरिक घाबरत असून त्याची चर्चा सुरू असल्याचेही प्रशासनाच्या लक्षात आले आहे. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, चाचणीसाठी आलेल्या सरकारी आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना खरी माहिती द्यावी, सहकार्य करावे.
नवलकिशोर राम म्हणाले, नागरिकांंनी काळजी घेणे आवश्यक आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठीच प्रशासन कडक धोरण राबवत आहे.
पुरूषांच्या बरोबरीने महिलांची संख्या दिसून येत आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडू नका.पुण्यासाठी हा कठीण काळ आहे.सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.जीवनावश्यक वस्तू एकाचवेळी आणून घ्या. वारंवार वस्तू आणायला बाहेर जाऊ नका.

#Pune#Corona#Update २३ एप्रिल-
दिवसभरात १०४ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– पुण्यात चार करोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू.

– डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण ६६७ रुग्णांवर उपचार.

– करोनाचा संसर्ग झालेले ८ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

– ३६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– २५ ससूनमध्ये तर उर्वरित रुग्णांवर खासगी हॉस्पिटलांमध्ये उपचार सुरू.

– पुण्यात एकूण पाॅझिटिव्ह रूग्णसंख्या ८७६.

- Advertisment -

ताज्या बातम्या