Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशCorona Update : भारतातील रुग्णवाढीचा आलेख उतरणीला... वाचा काय आहे सध्याची परिस्थिती?

Corona Update : भारतातील रुग्णवाढीचा आलेख उतरणीला… वाचा काय आहे सध्याची परिस्थिती?

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या (COVID19) आकडेवारीत चढ-उतार दिसत आहे. आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात करोनाचे (New corona patient today) १८ हजार ८७० नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३७८ जणांचा करोनामुळे मृत्यू (COVID19 death) झाला आहे. आतापर्यंत देशात एकूण ३ कोटी ३७ लाख १६ हजार ४५१ जणांना करोनाची लागण (Corona total patient) झाली आहे.

तसेच देशात सध्या २ लाख ८२ हजार ७५१ सक्रीय रुग्ण (Corona active cases) आहेत. दरम्यान गरल्या २४ तासांमध्ये २८ हजार १७८ जणांनी करोनावर मात केली असून आतापर्यंत ३ कोटी २९ लाख ५८ हजार ००२ जण करोनामुक्त झाले आहे. तर करोनामुळे ४ लाख ४७ हजार ७५१ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५४ लाख १३ हजार ३३२ नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण ८७ कोटी ६६ लाख ६३ हजार ४९० नागरिकांना लस देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती? (Corona update maharashtra)

करोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख राज्यातही खाली येताना पहायला मिळत असून करोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल २ हजार ८४४ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ६० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यात काल ३ हजार ०२९ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ६५ हजार २७७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या