Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशमोठी बातमी ! भारतात Covishield लसीच्या वापरास सशर्त मंजूरी

मोठी बातमी ! भारतात Covishield लसीच्या वापरास सशर्त मंजूरी

दिल्ली । Delhi

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतासाठी ही दिलासा देणारी बातमी आली आहे. ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका (Oxford-AstraZeneca) या कंपनीनं

- Advertisement -

विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ (Covishield) या करोना लसीला मान्यता मिळाली आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या आपत्कालिन वापराला मंजुरी मिळाली आहे. या लसीचं उत्पादन पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये सुरु आहे. मंगळवारी (29 डिसेंबर) ब्रिटनने ऑक्सफर्डच्या लसीला मान्यता दिली. त्यानंतर भारतातही या लसीला मान्यता देण्याच्या हालचाली सुरु होत्या. ही भारतातील पहिली लस ठरली.

SEC ने काही अटी-शर्तींसह सीरमची कोरोना लस ‘कोविशिल्ड’चा वापर करण्याची शिफारस केली आहे. या अटी कोणत्या असणार, याचा निर्णय आता डीसीजीआय घेणार आहे. ऑक्सफोर्डमधील करोना प्रतिबंधित लस ‘कोविशिल्ड’च्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्याची तयारी CDSCO तज्ज्ञ समितीने केली आहे. कोरोना लस ‘कोवाक्सिन’ च्या आपत्कालीन वापरास अनुमती देण्यासाठी आज बैठक पार पडली.

कोविशिल्ड या करोना लसीनं तिन्ही टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहे. चाचण्यांदरम्यान ही लस 90 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरली होती. मात्र, महिनाभराच्या अंतरानं या लसीचे 2-3 डोस घेतल्यास ही 95 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरते, असं सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावालांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळंच कोरोनाला भारतातून संपवण्यात कोविशिल्ड हे मुख्य हत्यार ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या