Tuesday, May 7, 2024
Homeनाशिकनगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या कार्यालयावर हल्ला

नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या कार्यालयावर हल्ला

नाशिकरोड | प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक 18 चे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व माजी सभापती विशाल संगमनेरे यांच्या जेलरोड येथील संपर्क कार्यालयावर दहा जणांच्या टोळक्याने हल्ला करून कार्यालयाची तोडफोड केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

- Advertisement -

यासंदर्भात सुनील पोपटराव घोंगडे यांनी तक्रार दाखल केली असून त्यात म्हटले आहे की शुक्रवारी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास पाच दुचाकी गाड्यावर ऋषिकेश उर्फ तात्या चौधरी सचिन डांगे अमोल बोराडे आदित्य बोराडे निखिल बोराडे व आणखी पाच जण असे एकूण 10 जन दुचाकी गाड्यावर आले होते.

त्यांनी जेलरोड येथील गणेश व्यायाम शाळेजवळ असलेल्या विशाल संगमनेरे यांच्या संपर्क कार्यालयावर शिवीगाळ करत लाठ्याकाठ्या ने हल्ला करून कार्यालयाची तोडफोड केली.

यावेळी कार्यालयाच्या ठिकाणी विशाल संगमनेरे यांचा फोटो असलेला बोर्ड या टोळक्याने फोडला त्यानंतर हे सर्व पसार झाले.

दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार माळी हे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या