Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याभ्रष्टाचार : वाढता वाढता वाढे

भ्रष्टाचार : वाढता वाढता वाढे

नाशिक । वैभव कातकाडे Nashik

नुकतेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी डॉ वैशाली वीर-झनकर ( Dr. Vaishali Veer-Jhankar, Department of Education) यांच्यासह वाहनचालक आणि शिक्षक यांना आठ लाखांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( ( anti corruption bureau ) नाशिक जिल्हा परिषदेच्या ( ZP ) आवारातून ताब्यात घेतले आहे. यामुळे शिक्षण विभागाला काळिमा फासला गेल्याची चर्चा सर्व ठिकाणी होत आहे.

- Advertisement -

शिक्षणाधिकारी यांनी एका संस्थेच्या शिक्षकांचे पगार नियमित करण्यासाठी प्रत्येकी 25 हजार रुपये मागितले असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे भ्रष्टाचाराची कीड नुसती लागली नसून वाढतच जात आहे.

राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग शासकीय सेवक, अधिकारी यांवर कटाक्षाने नजर ठेवत आहे. यामध्ये 1068 या क्रमांकावर आलेल्या तक्रारी असो किंवा कोणी फोनवर दिलेली माहिती असो तातडीने उपाययोजना करण्यात तत्पर असतात. तसेच केलेल्या कार्याची दैनंदिन माहिती लाचलुचपत विभागाच्या संकेतस्थळावर अद्ययावत केली जात आहे.

गेल्या वर्षी कडक लॉकडाउन असतानाही भ्रष्टाचार आणि त्याअनुषंगाने सापळे कमी झाले नव्हते; त्यातच आता लॉकडाउनचे नियम शिथिल झाले असून, अनेक कार्यालयीन कामकाज सुरू झाले आहेत. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यांनीही गती पकडली आहे. या वर्षात नाशिक परिक्षेत्रात 84 सापळ्यात 114 आरोपींना अटक करण्यात आली आहे. लाचखोरीमध्ये नेहमीप्रमाणे महसूल, पोलिस हे अग्रेसरच आहे.

दरम्यान, राज्यात 1 जानेवारी ते 10 ऑगस्ट या कालावधीत राज्यात सापळ्यांची संख्या 475 इतकी झाली; यात 657 आरोपी लाच घेताना अटक झाले. नाशिकमध्येही हीच स्थिती आहे. 2020 या पूर्ण वर्षात नाशिक विभागामध्ये शंभर सापळे तर, चार अपसंपदाचे गुन्हे दाखल झाले होते. यंदा ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंतच 84 गुन्हे दाखल झाले असून, 114 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या