Friday, November 22, 2024
Homeनगरपाच हजारांच्या मदतीसाठी जिल्ह्यात पाच लाखांहून अधिक शेतकरी पात्र

पाच हजारांच्या मदतीसाठी जिल्ह्यात पाच लाखांहून अधिक शेतकरी पात्र

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गतवर्षीच्या कपाशी व सोयाबीनला चार हेक्टर मर्यादेत हेक्टरी पाच हजारांच्या पटीत जास्तीजास्त 20 हजारांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. यासाठी सरकारच्या पोर्टल पात्र शेतकर्‍यांची माहिती भरण्यात येत आहे. जिल्ह्यात संयुक्त अणि व्यक्तीगत पाच लाखांहून अधिक शेतकरी या मदत योजनेसाठी पात्र आहेत. त्यांची माहिती ऑनलाईन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी सार्वमतला दिली.

- Advertisement -

गतवर्षी सोयाबीन व कापसाला हमी भावदेखील मिळालेला नाही. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांनी ई-पीक पाहणीद्वारे ऑनलाईन पीक पेरा नोंदविलेला आहे, अशा शेतकर्‍यांना शासन मदत देण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाली होती. दरम्यान, परळी (बीड) येथील कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकर्‍यांना सरसकट मदत देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार आता राज्यातील पात्र शेतकर्‍यांना हेक्टरी पाच हजारांप्रमाणे आर्थिक मदत देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. शेतकर्‍यांना त्यांचा आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, संमतीपत्र, संयुक्त खातेदारांचे अफिडेविट कृषी सहायकाला द्यावे लागणार आहे. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे कागदपत्र जातील, या माहितीद्वारे आधार प्रमाणीकरण होणार आहे.

नगर जिल्ह्यात मागील वर्षी सोयाबीन आणि कपाशीचे पिक असणारी 4 लाख 54 हजार व्यक्तीगत खातेदार शेतकरी असून त्यापैकी 3 लाख 62 हजार शेतकर्‍यांची माहिती सरकारच्या पोटर्लवर भरण्यात आलेली आहे. उर्वरित शेतकर्‍यांचा डाटा संकलित करण्यात येत आहे. तसेच पात्र असणार्‍या व्यक्तीगत शेतकर्‍यांकडून संमती पत्राव्दारे त्यांचे बँक खाते लिंक असणार्‍या खात्यावर मदतीची रक्कम वर्ग करण्याची मागणी भरून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात अशी 73 हजार 801 संयुक्त खाते असणारी पात्र शेतकरी आहेत. सरकारच्या नियोजनानूसार गेल्यावर्षीच्या शेतकर्‍यांच्या कपाशी व सोयाबीनला चार हेक्टर मर्यादेत हेक्टरी पाच हजाराच्या पटीत जास्तीजास्त 20 हजारांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. म्हणजे एका हेक्टरला पाच हजार तर जास्तीजास्त चार हेक्टरपर्यंत 20 हजारांची मदत मिळणार असून यात कमीत कमी 20 गुंठ्यापर्यंत सोयाबीन अथवा कपाशी पिक असणार्‍या पिकांना सरकारची मदत मिळणार आहे. जिल्ह्यात आर्थिक मदत मिळणारी 5 लाखांहून अधिकचे शेतकरी असल्याची प्राथमिक माहिती कृषी अधीक्षक बोराळे यांनी दिली.

संयुक्त खातेदारांचे हवे अफिडेव्हिट
संयुक्त खातेदार नाहरकत प्रमाणपत्रावर इतर सह हिस्सेदारांच्या स्वतःच सह्या करीत आहे. एकापेक्षा अधिक खातेदार सर्वांच्या सह्यांचे नाहरकत प्रमाणपत्र आणून देत असल्याने रक्कम कोणाच्या खात्यावर जमा करावी, याचा पेच निर्माण होत आहे. त्यामुळे सर्व सह हिस्सेदारांच्या स्वाक्षरीचे अफिडेविट हे ज्याच्या खात्यात रक्कम जमा करावयाची आहे, त्याला कृषी विभागाकडे सादर करावे लागणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या