Monday, May 27, 2024
Homeनगरचोरट्यांच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा जागीच मृत्यू

चोरट्यांच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा जागीच मृत्यू

करंजी |प्रतिनिधी| Karanji

पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील कडगाव (Kadgav) शिवारातील एका शेतकर्‍याच्या वस्तीवर कापसाची चोरी (Cotton Theft) करण्यासाठी गेलेल्या चोरट्यांना विरोध केल्याने त्यांनी शेतकर्‍यावर हल्ला (Farmer Attack) केला. या हल्ल्यात शेतकर्‍याचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना शुक्रवारी (दि.10) मध्यरात्री घडली आहे. कारभारी रामदास शिरसाट (55) असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी तालुक्यातील कडगाव शिवारातील मोहजबुद्रुक मिरी रस्त्यावर शिरसाट यांची वस्ती आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील 96 महसुली मंडळे दुष्काळसदृश जाहीर

शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्या वस्तीवर आज्ञात चोरटे त्यांनी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेला कापूस चोरून नेण्यासाठी आले होते. त्यांनी शिरसाठ यांच्या शेडमधील दहा-बारा कापसाच्या गोण्या उचलून नेत जवळच्या उसात नेऊन ठेवल्या. कापूस चोरून (Cotton Theft) नेत असताना पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले शिरसाट यांना जाग आली. त्यांनी आरडओरड करण्याचा प्रयत्न करत विरोध केल्याने चोरट्यांनी त्यांच्यावर हत्यारांनी हल्ला केला. या घटनेमध्ये कारभारी शिरसाठ यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. ही घटना दुसर्‍या दिवशी शिरसाट यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यानंतर काही वेळातच या ठिकाणी पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, डीवायएसपी सुनील पाटील, उपअधीक्षक प्रशांत खैरे यांनी देखील तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन आरोपींचा कसून शोध घेण्याच्या दृष्टीने तपास यंत्रणा गतिमान केली आहे.

संगमनेरच्या जेलमधून पळालेले गुन्हेगार जळगावात जेरबंद

श्वानपथक, ठसेतज्ञ यांनी देखील घटनास्थळाची पाहणी करून तपास यंत्रणेला मदत केली. कारभारी शिरसाट यांचा एक मुलगा सैन्यदलात आहे. तर दुसरा इंजिनियर आहे वडिलांच्या मृत्यूची माहिती समजताच इंजिनीयर मुलगा नगरहून कडगाव येथे आल्यानंतर कारभारी शिरसाट यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुढे पाठवण्यात आला.एैन दिवाळीच्या तोंडावर शिरसाठ यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे (Death) कडगावसह परिसरातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तपासले ४६ लाख दस्त, सापडल्या ८५ हजार कुणबीच्या नोंदी

सध्या कापसाला सात हजार रुपयांहुन अधिक भाव असून ग्रामीण भागात कापूस वेचनी जोरात सुरू आहे. अनेक शेतकरी कापूस वेचून तो घरामध्ये अथवा पत्राचे शेडमध्ये साठवून ठेवतात. याचाच फायदा उचलत शेतकरी शिरसाट यांनी शेडमध्ये साठवून ठेवलेला कापूस चोरून नेण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी या कष्टकरी शेतकर्‍याच्या कापसासाठी जीव घेतला आहे. 

शासकीय वाळूचे वितरण रखडल्याने वाळूतस्करी फोफावली

- Advertisment -

ताज्या बातम्या