जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
येथील कॅनरा बँकेच्या (Canara Bank) शाखेत तीन खातेदारांनी बनावट सोने तारण (Counterfeit Gold Mortgage) ठेवून तब्बल 17 लाख 73 हजार रुपयांचे कर्ज (Loan) घेऊन बँकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक आनंद डोळसे यांनी जामखेड पोलिस ठाण्यात (Jamkhed Police Station) दिलेल्या फिर्यादीवरुन चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, आरोपींनी गोल्ड व्हॅल्युअर (सोने तपासणी अधिकारी) याच्याशी संगनमत करून बनावट दागिने तारण ठेवले होते. दरम्यान, 13 मार्च 2025 ला कॅनरा बँकेच्या नाशिक (Nashik) येथील क्षेत्रीय कार्यालयातर्फे पाठविण्यात आलेल्या स्वतंत्र व्हॅल्युअरने तपासणी केल्यानंतर सोने बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी मुनावर अजीम खान पठाण (रा. नुराणी कॉलनी), अनिता संतोष जमदाडे (रा. बाजारतळ), व दिगांबर उत्तम आजबे (रा. आजबे वाडा, मेन रोड) यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गोल्ड व्हॅल्युअर आण्णासाहेब कोल्हे (रा. शिवम ज्वेलर्स, जामखेड) याच्यावर फसवणुकीत (Fraud) सहभागी असल्याचा आरोप आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील करत आहेत.