Wednesday, June 26, 2024
Homeमहाराष्ट्रलालबागच्या राजाचरणी पहिल्याच दिवशी लाखोंचं दान! नोटांच्या माळा, सोन्याचे दागिने लालबागच्या राजाच्या...

लालबागच्या राजाचरणी पहिल्याच दिवशी लाखोंचं दान! नोटांच्या माळा, सोन्याचे दागिने लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मुंबईसह महाराष्ट्रात कालपासून गणेशोत्सवाला (Ganeshotsav) सुरुवात झाली आहे. मुंबईत लालबाग नगरीत स्थापन होणाऱ्या लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) देशभरात चर्चा असते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसात देशभरातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ओळख आहे. यंदाही गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून लालबागच्या राजाच्या दर्शनाला गर्दी उसळली आहे.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तब्बल २५ लाखांहून अधिक भाविकांनी लालबागच्या राज्याचे दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे. सामान्य नागरिकांसह अनेक बॉलिवुड कलाकर, क्रिकेटर्स यांच्यासह अनेक इतर प्रसिद्ध लोक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. हेच भाविक राजाच्या चरणी भरभरून दान देतात. यावेळी रोख रक्कम, सोने-चांदीच्या वस्तूंसह अनेक गोष्टी दान केल्या जातात. राजाच्या चरणी होत असल्या दानाची योग्य मोजणी करण्यात येते.

लालबागच्या राजाच्या मंडपात ठेवण्यात आलेली दानपेटी आज उघडण्यात आली. पहिल्याचदिवशी भाविकांनी भरभरुन लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केले आहे. रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने या दानपेटीत आहेत. नोटांच्या माळा यामध्ये आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेली रक्कम मोजणार आहेत. हे दागिने किंवा रक्कम किती आहे? ते मोजदाद झाल्यानंतरच समजेल.

या व्हिडीओमध्ये दान केलेल्या वस्तुंमध्ये सोने-चांदीचे दागीने, रोख रक्कम, इतर वस्तु दिल्याचे पाहयला मिळत असून गणेश मंडळाचे कर्मचारी हाताने या वस्तींची काळजीपूर्वक मोजणी करताना दिसत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या