मुंबई | प्रतिनिधी Mumbai
एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवलेल्या महाराष्ट्राने देशी-विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करून त्यांना सल्ला आणि मदत देण्यासाठी “कंट्री डेस्क” या विशेष कक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या माध्यमातून नवीन गुंतवणुकीसाठी जागतिक आणि प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
World Chess Championship -2024 : जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा डी. गुकेश विश्वविजेता
राज्य सरकार आणि प्रमुख उद्योग गटांमध्ये समन्वय वाढवण्याच्या दृष्टीने औद्योगिक समन्वय सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महाराष्ट्रात प्राधान्याने गुंतवणूक व्हावी यासाठी संभाव्य गुंतवणूकदारांसोबत संवाद प्रस्थापित करण्यात येत आहे. याद्वारे गुंतवणुकीच्या दृष्टीने सातत्याने सहकार्य देण्यात येईल. आजपर्यंत झालेल्या सामंजस्य करारांची अंमलबजावणी जलद गतीने करण्यात येईल. त्याचबरोबर महाराष्ट्रातील गुंतवणूक संधींबाबत जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे.
कपूर कुटुंबीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, राज कपूर चित्रपट महोत्सवासाठी दिले निमंत्रण
याअंतर्गत बहुपक्षीय संस्थांशी आणि विकास बँकांशी सहकार्य वाढवणे, दूतावास आणि व्यापार संघटनांशी समन्वय वाढवणे, महाराष्ट्रातील मराठी प्रवासी समुदायाला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे आणि इलेक्ट्रॉनिक्स, कापड, ऑटोमोबाईल आणि औषधनिर्मिती अशा विविध क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. या नव्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मैत्री व उद्योग संचालनालय सक्रिय भूमिका बजावणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा