धुळे | प्रतिनिधी dhule
एस.टी.बस (ST Bus) वाहकाच्या सतर्कतेनंतर शहर पोलिसांनी (police) सुरत (surat) येथील प्रवाशाला ताब्यात घेत त्यांच्याकडून २४ हजारांची देशी दारू जप्त केली. तांदळाच्या साळीच्या गोण्यामधून तो दारूची तस्करी करीत होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजेचा धक्का लागून १४ वर्षीय मुलीचा मृत्यू
धुळे मध्यवर्ती बसस्थानकात आज सकाळी सव्वा दहा वाजता अमळनेर-बडोदा बस (क्रं.एमच-२०-बीएल २५३४) दाखल झाली. त्यानंतर या बसवरील वाहकाला बसमधील एक प्रवासी हा सोबत ४ गोण्यांमध्ये काहीतरी संशयास्पद स्थितीत सुरत येथे घेवुन जात असल्याचे लक्षात आले. त्याने याबाबत आगार व्यवस्थापकांना सांगितले. त्यांनी तत्काळ बस स्थानकातील डयुटीवरील पोलिस हवालदार ज्ञानेश्वर साळुंके व पोलिस नाईक वैभव वाडीले यांना ही माहिती दिली. त्यांनी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना कळविले.
निरीक्षक आनंद कोकरे यांनी तत्काळ शोध पथकातील पोना कुंदन पटाईत, पोकॉ महेश मोरे, मनिष सोनगिरे, अविनाश कराड, प्रविण पाटील, गुणवंतराव पाटील व निलेश पोतदार यांच्या पथकाला बसस्थानकात खात्री करण्यासाठी पाठविले. पथकाने माहितीप्रमाणे अमळनेर-बडोदा या बसमधील प्रवासी प्रविण मोतीराम पाटील (रा. सुरत, गुजरात) याच्याकडील ४ गोण्या उघडून बघितल्या. तेव्हा त्यात तांदळाची साळमध्ये देशी दारु सौफ नावाच्या ९० मि.ली च्या एकुण ७०० प्लास्टीकच्या सिलबंद बाटल्या मिळून आल्या. त्यामुळे प्रवासी प्रविण पाटील याला ताब्यात घेत त्यांच्याकडून एकुण २४ हजार ५०० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.