Monday, May 27, 2024
Homeदेश विदेशदेशातील सगळ्यात मोठा डेटा लीक! 'इतक्या' कोटी लोकांचे आधार आणि पासपोर्टची माहिती...

देशातील सगळ्यात मोठा डेटा लीक! ‘इतक्या’ कोटी लोकांचे आधार आणि पासपोर्टची माहिती डार्क वेबवर

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक (Country’s Biggest Sensitive Data Leak)समोर आला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे (ICMR) उपलब्ध ८१.५ कोटी भारतीयांची माहिती विकली जात आहे. एका अमेरिकन फर्मने डेटा लीक झाल्याचा दावा केल्याने खळबळ माजली आहे. डार्क वेबवर आधार डेटा लीक झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, हे प्रकरण इतके गंभीर आहे की की आयसीएमआरच्या तक्रारीवरून देशातील सर्वात मोठी तपास संस्था सीबीआय त्याची चौकशी करू शकते. डार्क वेबवर ८१.५ कोटी भारतीयांचा आधार कार्ड आणि पासपोर्ट संबंधित डेटा लीक झाल्याचा दावा अमेरिकन कंपनीने केला आहे. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, अमेरिकन कंपनी रिसिक्युरिटीचा दावा आहे की, ८१.५ कोटी भारतीयांचा आधार आणि पासपोर्ट संबंधित डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे.

Maratha Reservation: आंदोलन हिंसक होत असल्याने घेतला महत्वाचा निर्णय; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, हॅकिंग आणि फिशिंगसारख्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी नोडल एजन्सी सीईआरटी-इनने आयसीएमआरला याबद्दल माहिती दिली आहे. माहितीनुसार, समोर आलेला सँपल डेटा आयसीएमआरकडे उपलब्ध असलेल्या वास्तविक डेटाशी तंतोतंत जुळतो.

या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन अनेक यंत्रणा आणि मंत्रालयांचे सर्व उच्च अधिकारी त्याबाबत सक्रिय झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर या लीकमागे परदेशी हात असल्याचं मानलं जात असेल तर त्याची मोठ्या एजन्सीकडून चौकशी करावी लागणार आहे.

शिंदे गटाला धक्का! मराठा आरक्षणासाठी आमदार बोरनारे यांचा राजीनामा

लीक झालेल्या माहितीमध्ये नाव, फोन नंबर, पत्ता, आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती आहे. अमेरिकन फर्मने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ९ ऑक्टोबर रोजी ‘pwn0001’ या व्यक्तीने ब्रीच फोरमवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये ८१.५ कोटी भारतीयांच्या आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती देण्यात आली आणि हा डेटा विकण्याचा प्रयत्न केला गेला. सुरक्षा अहवालानुसार, संबंधित व्यक्तीने आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती ८० हजार डॉलरमध्ये विकण्याची ऑफर दिली होती.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

देशाची लोकसंख्या १४८.६ कोटी आहे, म्हणजेच जवळपास ५५ टक्के भारतीयांचा डाटाबेस ऑनलाइन उपलब्ध आहे. यावरून हा डेटा किती भयावह आहे, याचा अंदाज येतो. pwn0001 ने पुरावा म्हणून आधार डेटा असलेले चार मोठे लीक सँपल्स पोस्ट केले आहेत. एका सँपलमध्ये १ लाख नोंदी आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या