Sunday, November 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकसारा घाटात कंटेनरखाली दबून दाम्पत्याचा मृत्यू; अपघातग्रस्त कंटेनर हटवताना उघडकीस आली दुर्घटना

कसारा घाटात कंटेनरखाली दबून दाम्पत्याचा मृत्यू; अपघातग्रस्त कंटेनर हटवताना उघडकीस आली दुर्घटना

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

- Advertisement -

नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात कटेनर पलटी होऊन कंटेनर खाली सापडून एका दाम्पत्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या वेळेस अपघात ग्रस्त कटेनर खाली दुचाकी सापडली असल्याचे माहिती कोणालाही नव्हती. अपघातग्रस्त कटेनर बाजूला करते वेळी हीं दुर्दैवी बाब आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांच्या लक्षात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि शुक्रवारी सकाळी नाशिकहुन मुंबईकडे निघालेला कंटेनर क्रमांक एन एल ०१ एन ०६८८ हा भरधाव वेगात जातं असताना सकाळी अकरा वाजता नवीन कसारा घाटातील नागमोडी वळण घेत असताना चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला व कंटेनर जागीच पलटी झाला. परंतु या कंटेनरच्याच मागोमाग दुचाकी असल्याचे कोणासही माहिती नव्हते. त्यामुळे कटेनर पलटी झाल्याची व कोणासंही दुखापत नसल्याची नोंद कसारा पोलीस ठाण्यात करण्यात आली.

दरम्यान दुसऱ्या दिवशी अपघात ग्रस्त कंटेनर काढण्यासाठी काम सुरु करण्यात आले त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य लक्ष्मण वाघ, जसविंदर सिंग, दत्ता वाताडे, बाळू मांगे हे क्रेनसह घटनास्थळी गेले असता कटेनर खाली केल्यावर उग्र वास येऊ लागल्याने टीम सदस्य लक्ष्मण वाघ व जसविंदर भाई, व बाळूमांगे यांना संशय आल्याने त्यानी टीमचे अध्यक्ष शाम धुमाळ यांना संपर्क केला व त्यांनी सदर प्रकार सांगितला. या दुर्दैवी अपघाताची माहिती तात्काळ कसारा पोलीस ठाण्यास दिली.

या दुर्दैवी अपघातची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देतं आपत्ती व्यवस्थापन टीम, कसारा, महामार्ग पोलीस घोटी केंद्र, व कसारा पोलीस यांनी क्रेनच्या मदतीने कंटेनर बाजूला करून दबलेले दुचाकी व मृतदेह बाहेर कडून सदर पती पत्नीचे मृतदेह रुग्णवाहिकेतून कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. जालिंदर भगत व अनुसया भगत असे या पती पत्नीचे नाव असून ते घोटी येथील राहणारे असल्याचे समजले. दरम्यान या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी निखिल लसने ,सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम, पोलीस हवालदार उमेश चौधरी, पोलीस हवालदार देवेंद्र शिरसाठ हे पुढील तपास करीत आहेत.

वर्षश्राद्ध कार्यक्रमासाठी हे दाम्पत्य शुक्रवारी सकाळी घोटीहुन कसारा येथे जाण्यासाठी निघालेले हे भगत दाम्पत्य कसारा येथे कार्यक्रमात पोहचले नसल्याने घरच्या लोकांनी रात्री शोधा शोध सुरु केली. परंतु काही केल्या त्यांचे लोकेशन लागत नव्हते. आज सकाळी जेव्हा हीं बातमी कळली तेव्हा नातेवाईनातेवाईकांनी कसारा घाटात धाव घेतली व सदर मृतदेह हे जालीदर भगत व त्याच्या पत्नीचे असल्याचे निष्पन्न झाले.

ताज्या बातम्या

ई-पीक पाहणीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत

0
मुंबई |प्रतिनिधी| Mumbai शेतकर्‍यांची मागणी लक्षात घेऊन ई-पीक पाहणीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली असून, मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागांत शेतकर्‍यांना ऑफलाइन पद्धतीनेही ई-पीक पाहणी करता...