मुंबई | Mumbai
सध्या गणेशोत्सवाची सर्वत्र धुम सुरु आहे. नुकतेच पाच दिवसांच्या गणरायाचे वाजत गाजत विसर्जन करुन मंडळी घरी आले आणि लक्षात आले की गणपतीच्या मुर्तीवर घातलेली खरी सोन्याची माळच गणपतीसोबत विसर्जीत केली. गणपती बाप्पाचे विसर्जन करताना तब्बल चार लाख रुपयांची ६० ग्रॅम सोन्याच्या साखळीसह गणपती बाप्पाचे विसर्जन केल्याचा प्रकार समोर आला आहे. बंगळूरुत ही घटना घडली आहे.
नेमके काय घडले?
बंगळुरुतील विजयनगरमधील दहशरहाली सर्कल भागातील हा प्रकार असून रामय्या आणि उमादेवी या जोडप्याने दीड दिवसांच्या घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी ४ लाख रुपये किमतीची ६० ग्रॅम वजन असलेली सोन साखळी गणपतीच्या मुर्तीवर घातली. गणपतीचे विसर्जन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांनी बाप्पाच्या मूर्तीवर चढवलेली सोनसाखळी विसर्जनावेळी काढलीच नव्हती. घडलेला प्रकार समोर आल्यानंतर दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली.
सुरवातीला संबंधित ठेकेदाराने पाणी उपसण्यास नकार दिला. त्यानंतर त्या कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली. यानंतर प्रशासनाच्या मदतीने साखळीचा शोध घेण्यास सुरुवात झाली. तब्बल १० तास हे कुटुंबीय साखळीचा शोध घेत होते. या साखळीच्या शोधासाठी १० हजार लिटर पाणी बाहेर काढण्यात आलं. यासाठी कंत्राटदाराने आपल्या मुलांना साखळी शोधण्यासाठी कामाला लावलं होतं. त्यानंतर अखेर ही साखळी सापडली. आणि बेंगळुरूच्या गोविंदराजनगर येथील या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, एका वृत्तपत्राच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
दरम्यान, आपण सोनसाखळीसहीत गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केल्याचे लक्षात आल्यानंतर या दोघांनी तातडीने या कृत्रिम तळ्याकडे धाव घेतली. गणेश मूर्तीचे विसर्जन करणाऱ्या मुलाने मूर्तीच्या गळ्यात सोनसाखळी पाहिली होती. मात्र ती खोटी असेल म्हणून ठेवली आहे. असे वाटून त्याने मूर्तीचे विसर्जन केले. यासंदर्भात आपण एकदा विसर्जनाआधी विचारपूस करायला हवी होती, असे या तरुणांनी सारा प्रकार लक्षात आल्यानंतर म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा