Sunday, March 30, 2025
HomeनाशिकNashik News : पंचवटी एक्सप्रेसची अचानक कपलिंग तुटली अन्…

Nashik News : पंचवटी एक्सप्रेसची अचानक कपलिंग तुटली अन्…

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या मनमाड-नाशिक-मुंबई पंचवटी एक्सप्रेसची (Manmad Nashik Mumbai Panchvati Express) अचानक कपलिंग तुटल्याने इंजिन व एक बोगी काही अंतरावर पुढे निघुन गेल्याची घटना आज सकाळच्या सुमारास कसाऱ्याजवळ घडली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, मनमाडहून (Manmad) मुंबईच्या दिशेने जाणारी पंचवटी एक्सप्रेसने शनिवार (दि.६) रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान कसारा रेल्वे स्टेशन (Railway Station) सोडल्यानंतर अचानक कपलिंग तुटली. यामुळे इंजिन व एक बोगी मुंबईच्या दिशेने निघुन गेली तर बाकी पंचवटी एक्सप्रेसच्या बोग्या मागे राहिल्या.

रवींद्र वायकरांना ‘त्या’ प्रकरणात मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे

दरम्यान, ही बाब चालकाच्या लक्षात येताच चालकाने इंजिन थांबवून पुन्हा इंजिन मागे आणून बाकी बोग्यांना जोडण्यात आले. यानंतर ही एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची धावपळ उडाली. तसेच कपलिंग दुरुस्तीनंतर ४० मिनिटांनी पंचवटी एक्स्प्रेस मुंबईकडे मार्गस्थ झाल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे काही काळ रेल्वेची वाहतुक खोळबंली होती.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Haribhau Bagade : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले;...

0
मुंबई | Mumbai महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राजस्थानचे विद्यमान राज्यपाल (Rajasthan Governor) हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) हेलिकॉप्टर अपघातमधून थोडक्यात बचावले आहेत. राजस्थानमधील पाली...