Saturday, May 25, 2024
Homeमनोरंजनअभिनेत्री Tunisha Sharma च्या आत्महत्या प्रकरणात शिझान खानला जामीन मंजूर

अभिनेत्री Tunisha Sharma च्या आत्महत्या प्रकरणात शिझान खानला जामीन मंजूर

मुंबई | Mumbai

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून अटकेत असलेल्या शिझान खानला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने शिझानला एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तुनिषा शर्माच्या आत्महत्येच्या आरोपाखाली शिझानला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. २० वर्षीय अभिनेत्री तुनिशा शर्माने आत्महत्या केली आणि ती शिजान खानच्या मेक रूमच्या वॉशरूममध्ये गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळली होती.

तुनिशाच्या आईने त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीनंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शिजानला नंतर अटक करण्यात होती. शिझान खान आणि तुनिषा शर्मा ‘अली बाबा’च्या लीड स्टार्स होत्या. या शोमध्ये दोघांची पहिली भेट झाली. लडाखमध्ये शूटिंगदरम्यान दोघेही प्रेमात पडले.

अनेक महिने एकमेकांना डेट केल्यानंतर शिझानने डिसेंबरमध्ये तुनिशासोबत ब्रेकअप केले होते. शिझान तुनिषाची फसवणूक करत असल्याचा दावा अभिनेत्रीच्या आईने केला आहे. जेव्हा तुनिशाला हे कळले तेव्हा तिचे ब्रेकअप झाले होते. एवढेच नाही तर तुनिशा डिप्रेशनची शिकार होती आणि तिला अनेकदा पॅनिक अटॅक आल्याचेही सांगण्यात आले. तुनिशाला 2018 मध्येही नैराश्य आले होते. त्याच्या आईवरही मुलीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होता.

तुनिशाने फक्त मालिकांमध्येच नाही, तर सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तुनिषाने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं आहे. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी 2: दुर्गा रानी सिंह’ आणि ‘दबंग 3′ या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.

- Advertisment -

ताज्या बातम्या