Wednesday, April 2, 2025
Homeमनोरंजनकंगना रनौतवर FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

कंगना रनौतवर FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

मुंबई | Mumbai

अभिनेत्री कंगना रनौतवर (Kangana Ranaut) सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश वांद्रे मजिस्ट्रेट कोर्टाने दिले आहेत. मजिस्ट्रेट कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यात कंगनाने प्रक्षोभक ट्विटद्वारे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. मोहम्मद इकबाल सैयद यांनी ही याचिका दाखल केली होती. तसंच बॉलिवूड मध्ये हिंदू-मुस्लिम असा वाद निर्माण करण्याचा तिचा प्रयत्न असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

वांद्रे कोर्टात कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय ती हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढही निर्माण करत आहे. कंगना वारंवार आक्षेपार्ह ट्विट करत असून यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडीओ सादर केले. त्यानंतर कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. याचिकाकर्त्यांना आधी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पण पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. यावेळी कोर्टाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल कऱण्याचा आदेश दिला. कंगना बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असून सोशल मीडियापासून ते टीव्हीपर्यंत सगळीकडे विरोधात बोलत असल्याचाही उल्लेख यावेळी कोर्टात करण्यात आला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

बागलाण तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा

0
बागलाण । प्रतिनिधी बागलाण तालुक्यातील भुयाने,करंजाड,अंतापुर,शेवरे शिवारात, तसेच पश्चिम पट्यासह मांगीतुंगी, मुल्हेर, ताहराबाद परीसरात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह दुपारी चार वाजेच्या दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार...