Thursday, May 23, 2024
HomeनाशिकNashik Road Crime News : वाहनांची जाळपोळ व तोडफोड करणाऱ्यांना...

Nashik Road Crime News : वाहनांची जाळपोळ व तोडफोड करणाऱ्यांना ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील विहितगाव व धोंगडे नगर परिसरात (Vihitgaon and Dhongde Nagar Area) दुचाकी जाळणाऱ्या तसेच वाहनांची तोडफोड करणाऱ्या संशयित आरोपींना (Suspected Accused) आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने (Court) त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे…

- Advertisement -

नाशिकरोड : कैद्याने कारागृह पोलिसाच्या कानशिलात लगावली

विहितगाव येथे रविवारी मध्यरात्री उमेश धोंगडे व राहुल सोनवणे यांनी चार गाड्या जाळत (Burning Cars) एकूण १५ गाड्यांचे नुकसान केले होते. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी धोंगडे नगर येथील राजलक्ष्मी मंगल कार्यालयाजवळ असलेल्या चार ते पाच वाहनांची शुभम बहेनवाल, रोशन पवार, मोहिज शेख, भय्यू बहनवाल व इतर तीन ते चार जणांनी वाहनांची तोडफोड (Vandalized) केली होती.

मोठी बातमी! विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या ४० आमदारांच्या अपात्रतेबाबत घेतला ‘हा’ निर्णय

त्यानंतर या सर्व संशयित आरोपींना उपनगर पोलिसांनी (Upnagar Police) अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे. तसेच याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik Road Crime News : वाहनांची तोडफोड करणाऱ्यांंची पोलिसांनी काढली धिंड

- Advertisment -

ताज्या बातम्या