Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशमुलांसाठी असणाऱ्या कोव्हॅक्सिनला अजून परवानगी नाही, आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

मुलांसाठी असणाऱ्या कोव्हॅक्सिनला अजून परवानगी नाही, आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

केंद्र सरकारने २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिनचा आपत्कालीन वापर करण्यास मान्यता दिल्याचे वृत्त आले होते. मात्र अजूनपर्यंत ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाले लसीच्या वापरासाठी (DCGI) मान्यता दिल्या नसल्याचे सांगितले आहे. वृत्तसंस्था एएनआयने अधिकृत सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

कोव्हॅक्सिन (Covaxin) या कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत (vaccine)एक मोठी बातमी समोर आली होती. त्या बातमीनुसार, आता 2 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना कोव्हॅक्सिन (Covaxin for Children)लस दिली जाणार आहे. याला मंजुरी देखील देण्यात आली आहे. भारत बायोटेक आणि ICMR ने मिळून कोव्हॅक्सिनची निर्मिती केली आहे. ही भारतीय बनावटीची लस आहे.केंद्र सरकार लवकरच २ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी करेल

- Advertisement -

तिसऱ्या लाटेपूर्वी केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक पालकांना दिलासा मिळणार आहे. DCGI नं कोव्हॅक्सिनला दिलेल्या परवानगीनंतर आता देशभरात लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रौढांप्रमाणेच मुलांनाही कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस दिल्या जातील. आतापर्यंत घेतलेल्या चाचण्यांमध्ये, कोव्हॅक्सिनचा मुलांवर कोणताही वाईट परिणाम दिसला नाही. क्लिनिकल चाचण्यांमध्ये, ही लस ७८ टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. यानंतर, ही लस केंद्राने मंजूर केली आहे.

सप्टेंबरमध्ये चाचणी पूर्ण

भारत बायोटेक(Bharat Biotech) च्या कोव्हॅक्सिनची सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची चाचणी पूर्ण झाली होती. ऑक्टोबरमध्ये कोव्हॅक्सिनच्या उत्पादनाची मर्यादा वाढवणार असल्याचंही कंपनीने म्हटलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या