Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशCovid-19 : देशात २.३ लाख सक्रिय रुग्ण; महाराष्ट्रात स्थिती काय?

Covid-19 : देशात २.३ लाख सक्रिय रुग्ण; महाराष्ट्रात स्थिती काय?

दिल्ली l Delhi

देशात गेल्या २४ तासात १६ हजारांहून अधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या आज पुन्हा एकदा वाढली असल्याचं दिसून आलं आहे.

- Advertisement -

मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज रुग्णांच्या संख्या काहीशी वाढली आहे. मात्र अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या थोडीशी कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनासाठी ही एक दिलासादायक बाब आहे.

दरम्यान आतापर्यंत १ कोटी ३ लाखांहून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासात देशात १६ हजार ३७५ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर देशात २०१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात २ लाख ३१ हजार ०३६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण १ कोटी ०३ लाख ५६ हजार ८४५ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी १ लाख ४९ हजार ८५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात स्थिती

राज्यात मागील २४ तासात २ हजार ७६५ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १९ लाख ४७ हजार ०११ एवढी झाली आहे. तर काल एका दिवसात १० हजार ३६२ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १८ लाख ४७ हजार ३६१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ४९ हजार ९५५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, काल एका दिवसात २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४९ हजार ६९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या