Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशCovid-19 : देशात २.६ लाख सक्रिय रुग्ण

Covid-19 : देशात २.६ लाख सक्रिय रुग्ण

दिल्ली l Delhi

देशात गेल्या २४ तासात २० हजारांहून अधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या आज पुन्हा एकदा वाढली असल्याचं दिसून आलं आहे.

- Advertisement -

मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज रुग्णांच्या संख्या काहीशी वाढली आहे. मात्र अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या थोडीशी कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनासाठी ही एक दिलासादायक बाब आहे.

दरम्यान आतापर्यंत १ कोटी २ लाखांहून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासात देशात २० हजार ५५० नवे रुग्ण आढळून आले आहेत तर देशात २८६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात २ लाख ६२ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात एकूण १ लाख ४८ हजाराहून अधिक करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण १ कोटी ०२ लाख ४४ हजार ८५३ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी १ लाख ४८ हजार ४३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या