Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशCOVID-19 : देशात ९ लाखाच्यावर रुग्णांवर उपचार सुरू

COVID-19 : देशात ९ लाखाच्यावर रुग्णांवर उपचार सुरू

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात ८५ हजाराच्या वर रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

- Advertisement -

गेल्या २४ तासात १ हजार ०८९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ८५ हजार ३६२ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ५९ लाख ३ हजार ९३३ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ४८ लाख ४९ हजार ५८५ रूग्ण करोनामुक्त झाले असून ९ लाख ६० हजार ९६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत ९३ हजार ३७९ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

गेल्या २४ तासात आजपर्यंतच्या सर्वाधिक चाचण्या

ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, कालपर्यंत देशात एकूण ७,०२,६९,९७५ नमूने तपासण्यात आले. त्यातील १३ लाख ४१ हजार ५३५ नमूण्यांची काल तपासणी झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या