Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशCovid-19 : देशात १४० दिवसांनंतर अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ४ लाखांपेक्षा कमी

Covid-19 : देशात १४० दिवसांनंतर अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ४ लाखांपेक्षा कमी

दिल्ली | Delhi

भारतासह जगभरातील सुमारे १८० पेक्षा जास्त देशात करोनाने हाहाकार माजवला आहे. देशातील करोनाबाधितांच्या संख्येने ९६ लाखांचा आकडा ओलांडला आहे.

- Advertisement -

भारतामध्ये आज १४० दिवसांनंतर अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ४ लाख पेक्षा कमी नोंदवण्यात आली आहे. तर दररोज मृतांचा आकडा हा १५७ दिवसांनंतर ४०० पेक्षा कमी झाला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,

देशात गेल्या २४ तासात ३२ हजार ९८१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, ३९१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील करोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा ९६ लाख ७७ हजार २०३ एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात ३ लाख ९६ हजार ७२९ रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे १ लाख ४० हजार ५७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे ९१ लाख ३९ हजार ९०१ जणांनी करोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४४ टक्के असून, रुग्ण सक्रिय होण्याचा प्रमाण ४.०९ टक्के इतका आहे. तर मृत्युचा प्रमाण हा १.४५ टक्के इतका आहे.

सिरमकडून लशीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव

करोना व्हायरस (Coronavirus) महामारीच्या पार्श्वभूमीवर COVID-19 लसीच्या मंजुरीसाठी जोर दिला जात आहे. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) यांनी भारतातून कोविड-19 लस “कोविशील्ड (Covishield)” च्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी यासाठी भारतीय औषध महानियंत्रक (DGCI) समोर प्रस्ताव सादर केला आहे.

यासोबतच सीरम इंस्टीट्यूट (SII) करोना लशीचा प्रस्ताव सदर करणारी दुसरी कंपनी ठरली आहे. याआधी अमेरिकन कंपनी फाइजर (Pfizer) ने मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता.

याबाबत कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, क्लीनिकल परीक्षणामध्ये सिरमची लस प्रभावी असल्याचे समोर आले होते. यामध्ये कोविड-19 च्या गंभीर रुग्णांना चांगला फायदा याचा झाला आहे. चार परीक्षण करण्यात आले आहे यामध्ये चार मधून दोन परीक्षण ब्रिटन आणि एक-एक भारत आणि ब्राजील संबंधित आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या